ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे ही एक शिष्यवृत्तीसंदर्भात काम करणारी एक संस्था आहे. स्पर्धा परीक्षांची भीती न वाटता त्याबद्दल गोडी निर्माण करण्याचे काम ही संस्था करते.
या संस्थेतर्फे शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करते. यामध्ये इ.पहिली, दुसरीसाठी नैपुण्य चाचणी १ व २ तर इ. तिसरीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेचे आयोजन करते. इ.पहिली, दुसरीसाठी असणा-या परीक्षा शालेय स्तरावर तर इ. तिसरीसाठी असणा-या परीक्षा अंतरशालेय स्तरावर घेतली जाते. या परीक्षांसाठी पुण्यातील अनेक नामवंत शाळांचा सहभाग आहे.
या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-यांना गुणपत्रक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांना प्रमाणपत्रक, शालेय उपयोगी वस्तू जसे वह्या, कंपास बॉक्स, राईटींग पॅड, पेन, दप्तर/सॅक शालेय पूरक पुस्तके जसे शब्दकोश, समानार्थी- विरूध्दार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचारांची पुस्तके व बालसाहित्य दिली जातात.
इ. तिसरीच्या शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेत सन २०१२-१३ मध्ये ५३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७५ विद्यार्थ्यांना एकूण ४०,००० रुपयांची शिष्यवृत्तीची पुस्तके दिली. या वर्षी ८५४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १३२ विद्यार्थ्यांना एकूण ७०,००० रुपयांची शिष्यवृत्ती शालेय वस्तूच्या स्वरुपात देणार आहोत.
शिष्यवृत्ती मिळवणा-यांची संख्या बसणा-या विद्यार्थ्यांच्या स्वरुपात असते. साधारणपणे १००० विद्यार्थ्यांमध्ये १५० विद्यार्थ्यांना आपण शिष्यवृत्ती देतो.
शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेमुळे इयत्ता चौथीच्या शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची भीती कमी झाली. असे अभिप्राय अनेक शाळांनी तसेच पालकांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच संस्था शिष्यवृत्ती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या दोन शिक्षकांचा ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार व ज्ञानांजन युवा पुरस्कार देऊन सन्मान करते.
शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शाळा अशा सर्व स्तरावर कार्यरत आहे.शिष्यवृत्ती संदर्भात अनेक नवनवीन उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.