![]() |
इ.३रीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची पूर्वतयारी होण्याच्या दृष्टीने ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी पुणे आयोजित शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षा हा उत्कृष्ट पर्याय आहे. इ.३रीच्या विद्यार्थ्यांना झेपेल व समजेल अशा सोप्या भाषेत या पुस्तकाची रचना आहे. प्रत्येक विषयाचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग विद्यार्थ्यांना होतो. मार्गदर्शक व सरावासाठी ही याचा फायदा मुलांना होतो, व पालकांनाही मुलांकडून अभ्यास करुन घेण्यासाठी उपयोग होतो. संस्थेची १००० विद्यार्थ्यांमागे १५० विद्यार्थ्यांना पुस्तकरुपात बक्षिसे देण्याची योजना स्तुत्य आहे. संस्थेच्या विविध उपक्रमांमुळे/परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. |
![]() |
इ.४थी ची शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिली स्पर्धा परीक्षा. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी इ. ३री चा विद्यार्थी सक्षम असला पाहिजे. शिष्यवृत्तीची दृष्टी इ.३री पासूनच येणे आवश्यक आहे. हे काम नियोजन पूर्वक ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी ही संस्था करत आहे. गेली २ वर्षे आम्ही आमच्या हुजूरपागा शाळेतील इ. ३री च्या १५० विद्यार्थीनींना शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेला बसवतो. इ.४थी ची शिष्यवृत्ती परीक्षेची उत्तम तयारी होते. या परीक्षेचा अभ्यासक्रम इ.३री च्या अभ्यासक्रमावर आधारित असून नियोजन अतिशय उत्तम असते. संस्थेला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. |
![]() |
ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी शिष्यवृत्तीपूरक अशा इ.१ ली ते ३ री च्या परीक्षा अतिशय चांगल्या त-हेने गेली २ वर्षे घेत आहे. परीक्षांच्या नावापासून ते बक्षिसांच्या शिष्यवृत्तीपर्यंत त्यांची विविधता व वेगळेपण संस्था जपत आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत सोप्याकडून अवघड प्रश्नांकडे जाणारी प्रश्नांची रचना, मूळ घटकाच्या संकल्पनांवर आधारित प्रश्न, सुबक, स्पष्ट आकृत्या. या बरोबरच संस्थेचे प्रत्येक बाबतीतले नियोजन हे उत्कृष्ट असते. विद्यार्थ्यांना उत्तमातले उत्तम कसे मिळेल? या कडे संस्थेचे लक्ष असते. अशा उत्तमाचा ध्यास धरणा-या ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटीला आमच्या कात्रज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. . |
![]() |
आम्हाला सन २०१२-१३ ला ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी तर्फे घेण्यात येणारी इ.३री ची शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेची माहिती मिळाली. अगदी नावाला अनुरुप असे शिष्यवृत्तीची प्रारंभिक तयारी करून घेणारे पुस्तक, सोप्याकडून अवघडाकडे जाणारे घटक छान पद्धतीने, अभ्यासपूर्वक, सोप्या भाषेत दिले आहेत. मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांची विद्यार्थ्यांची भीती दूर झाली, आणि मुले व पुस्तके यांची छान गट्टी जमली. शिष्यवृत्ती परीक्षेचा खरा पायाच या परीक्षेमुळे तयार होतो. ही संस्था सर्व उपक्रम नियोजनपूर्वक करतेच. बक्षिस वितरण सोहळा तर अगदी वेळेचे नियोजन कसे असावे? याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने सुरु केलेल्या या संस्थेस आमच्या शाळेकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. |