ज्ञानांजन

ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

शिष्यवृत्ती संबंधी बरचं काही

इ.पाचवीच्या एकाच वर्षात मुलांना मराठीचे भरपूर पाठांतर, गणिती सुत्रे, त्यांची उदाहरणे, बुद्धिम त्ता चाचणी सार खा नवीन व बुद्धीला चालना देणारा विषय व त्याचबरोबर ओ. एम्. आर्. (O.M.R.) पध्दत यासर्व गोष्टी विद्द्यार्थ्याना एकाच वर्षात आत्मसात कराव्या लागतात. हा येणारा ताण कमी करण्यासाठी व इ. पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेत अधिक गुण मिळवण्यासाठी इ. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर इ. तिसरीपासून शिष्यवृती परीक्षे च्या अभ्यासाची गरज आहे असे वाटते. यासाठी 'ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी' ने 'शिष्यवृती प्रारंभिक व शिष्यवृती पूर्व या परीक्षा' यांचे आयोजन केले आहे. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम हा पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेशी साधर्म्य साधणारा असला तरी वयोगटाचा विचार केला गेला आहे. म्हणूनच इ.तिसरीची परीक्षा २५० तर चौथीची परीक्षा ३०० गुणांची आहे. तसेच तिसरीला बुध्दिमत्ता चाचणी हा स्वतंत्र विषय न ठेवता तो आहे त्या पेपरांमध्ये तरी ही स्वतःचे वेगळेपण जपणारा असा पहायला मिळेल सर्व अभ्यासक्रम तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केला असून भविष्यातील इ. पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेसाठी उपयुक्त आहे.

माहिती


इ. तिसरी - 'शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षा'

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप

पेपर क्र विषय प्रश्नसंख्या गुण
मराठी व इंग्रजी ६५ १३०
गणित ६० १२०



पेपराची काठीण्य पातळी ७०% सोपे, २०% मध्यम, १०% अवघड
परीक्षा फेब्रुवारीच्या दुस-या किंवा तिस-या रविवारी होतील.
दोन्हीपेपर एकाच दिवशी होतील. पूर्ण परीक्षेची वेळ ११ ते ३.

परीक्षेची वैशिष्ट्ये


पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला पुरक परीक्षा
वयोगटानुरुप पेपराची काठिण्यपातळी
आत्मविश्वास वाढविणारी परीक्षा
ओ. एम्. आर्. (O.M.R.) पध्दतीनुसार पेपर
एक सराव परीक्षा
पास होणा-या विद्यार्थ्यांना गुणपत्रक
परीक्षेस बसणा-या विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात शिष्यवृत्ती (१००० विद्यार्थ्यामागे १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती)
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रोख रक्कमेऐवजी शालेय उपयोगी वस्तू, शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके, प्रश्नपत्रिकासंच, पुरकसाहित्य व इतर बालसाहित्य.

 प्रवेश फी भरण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट 
 विलंब शुल्कासहित प्रवेश फी  भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर 
 सराव परीक्षा साधारण ८ जानेवारी ते १५ जानेवारी 
 मुख्य परीक्षा  प्रत्येक वर्षी फेब्रुवारीच्या दुस-या किंवा तिस-या रविवारी 
 निकाल  साधारण २८ एप्रिल  (संकेतस्थळावर)
 बक्षिस वितरण समारंभ प्रत्येक वर्षी जूनच्या  दुस-या किंवा तिस-या रविवारी

इ. तिसरी

परीक्षेस बसणा-या विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाते.

१००० विद्यार्थ्यामागे १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना रोख रक्कमेऐवजी शालेय उपयोगी वस्तू, शालेय उपयोगी वस्तू जसे वह्या,

कंपास बॉक्स, राईटींग पॅड, पेन, दप्तर/सॅक शालेय पूरक पुस्तके जसे शब्दकोश,

समानार्थी- विरूध्दार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचारांची पुस्तके व बालसाहित्य १००० विद्यार्थ्यांमागे साधारणता खालील प्रमाणात शिष्यवृत्ती देण्यात येईल पहिल्या १० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु ८००/- ची पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू पुढील ३० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु ६००/- ची पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू पुढील ३० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु ४००/- ची पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू पुढील ३० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु २००/- ची पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेची परीक्षा फीः रु ३००/- आहे. यामध्ये फॉर्म फी, पुस्तक, परीक्षा फी,

गुणपत्रक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.