ज्ञानांजन

ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे.

शिष्यवृत्ती संबंधी बरचं काही

ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटी, पुणे ही एक शिष्यवृत्तीसंदर्भात काम करणारी एक संस्था आहे. स्पर्धा परीक्षांची भीती न वाटता त्याबद्दल गोडी निर्माण करण्याचे काम ही संस्था करते.
          या संस्थेतर्फे शालेय स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यामध्ये इ.पहिली, दुसरीसाठी नैपुण्य चाचणी १ व २ तर इ. तिसरीसाठी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेचे तसेच इ.चौथीसाठी शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेचे आयोजन करते. इ.पहिली, दुसरीसाठी असणा-या परीक्षा शालेय स्तरावर तर इ. तिसरी, चौथीसाठी असणा-या परीक्षा अंतरशालेय स्तरावर घेतल्या जातात . या परीक्षांसाठी पुण्यासह अनेक जिल्ह्यातील नामवंत शाळांचा सहभाग आहे.
           या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणा-यांना गुणपत्रक व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थांना प्रमाणपत्रक, शालेय उपयोगी वस्तू जसे वह्या, कंपास बॉक्स, राईटींग पॅड, पेन, दप्तर/सॅक शालेय पूरक पुस्तके जसे शब्दकोश, समानार्थी- विरूध्दार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचारांची पुस्तके व बालसाहित्य दिले जाते.
          शिष्यवृत्ती मिळवणा-यांची संख्या बसणा-या विद्यार्थ्यांच्या स्वरुपात असते.
          इ.पहिली, दुसरी नैपुण्य चाचणी १ व २ साठी शाळा स्तरावर ५० विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकी तीन क्रमांक.
          इ. तिसरी शिष्यवृत्ती प्रारंभिक परीक्षेसाठी साधारणपणे १००० विद्यार्थ्यांमध्ये १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तर इ. चौथी शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेसाठी साधारणपणे १००० विद्यार्थ्यांमध्ये १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
          सन २०१२-१३ पासून विद्यार्थ्यांचा सहभाग, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, सर्वांना मिळून दिलेली एकूण शिष्यवृत्ती पुढील प्रमाणे-
सन इयत्ता विद्यार्थी संख्या
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी एकूण शिष्यवृत्ती
२०१२-१३ तिसरी ५३४ ७५ ₹​ ४०७५०
२०१३-१४ तिसरी ८५४ १३२ ₹​ ७००००
२०१४-१५ तिसरी १०५० १५८ ₹​ ११०५००
२०१५-१६ तिसरी ११०७ १११ ₹​ ४३०००
चौथी ९४३ ११८ ₹​ ६०७५०
२०१६-१७ तिसरी ११८१ १२६ ₹​ ४८८००
चौथी १४०२ २१८ ₹​ ११२७५०
२०१७-१८ तिसरी १०७१ १०८ ₹​ ४१८००
चौथी ११०० १६७ ₹​ ८७०००

          शिष्यवृत्ती प्रारंभिक तसेच पूर्व परीक्षेमुळे इयत्ता पाचवीच्या शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेची भीती कमी झाली. असे अभिप्राय अनेक शाळांनी तसेच पालकांनी दिले आहेत.
           विद्यार्थ्यांबरोबरच संस्था शिष्यवृत्ती क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या दोन शिक्षकांचा ज्ञानांजन कृतज्ञता पुरस्कार व ज्ञानांजन युवा पुरस्कार देऊन सन्मान करते.
           शिष्यवृत्तीमध्ये संस्था विद्यार्थी, शिक्षक व शाळा अशा सर्व स्तरावर कार्यरत आहे. शिष्यवृत्ती संदर्भात अनेक नवनवीन उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.