सध्या सर्वत्र स्पर्धेचे युग आहे. मुलं जरा मोठी होऊ लागली की त्यांना विविध प्रकारच्या सी.ई.टी. सारख्या स्पर्धा परीक्षांना मग ११ वीच्या प्रवेशापासून, डी.एड्., बी.एड., मेडीकल, इंजीनिअरींग ते नोकरी लागेपर्यंत तसेच एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. सारख्या परीक्षांना सामोरे जावे लागते. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे बीज पेरण्याची आवश्यक्ता आहे. बदलत्या काळानुसार पाठ्यपुस्तके, अभ्यासक्रम बदलत आहे. आपण पाठ्यपुस्तकाचे बारकाईने वाचन केल्यास प्रत्येक भागात आपणास हा दृष्टीकोन निर्माण केल्याचे लक्षात येईल. हे जाणून ज्ञानांजन एज्युकेशन संस्थेने इ. पहिलीसाठी नैपुण्य चाचणी परीक्षा-१ व दुसरीसाठी नैपुण्य चाचणी परीक्षा-२ या परीक्षांचे आयोजन केले आहे.
अभ्यासक्रम
संपूर्ण पाठुयपुस्तक
ज्ञानांजन एज्युकेशन संस्थेने तयार केलेले छोटे पुस्तक
महत्वाच्या तारखा
सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांची नावे व परीक्षा फी पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट. ही परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा पातळीवर होते. परीक्षेचा निकाल साधारणपणे २५ एप्रिल पर्यंत शाळेत कळविण्यात येतो.
प्रश्नपत्रिकेचे स्वरुप
सदर परीक्षेचे मराठी व गणित हे दोन पेपर असतील. प्रत्येक पेपर ५० गुणांचा असून त्यामध्ये काही प्रश्न वस्तुनिष्ठ (पर्यायांचे) तर काही एका शब्दात उत्तरांसारखे असतील. प्रश्नपत्रिकेवरच उत्तरे लिहायची असुन पेपर झाल्यावर प्रश्नपत्रिका संस्थेकडे जमा करावयाच्या असतात.
साधारणपणे प्रश्नप्रकार :-
नैपूण्य चाचणी १ मराठी
मुळाक्षरे, स्वरचिन्हांसह अक्षरे, शब्दांचे अर्थ, शब्द पुर्ण करा, संबंधीत शब्द लिहा, गटात बसणारा शब्द लिहा, जोडाक्षरांचे लेखन
नैपूण्य चाचणी १ गणित
अक्षरात, अंकात, अधल्यामधल्या संख्या, पुढची मागची संख्या, रुपये पैसे, लहानमोठी संख्या
नैपूण्य चाचणी २ मराठी
२ ते ३ वाक्यांचा उतारा व त्यावरील प्रश्न. क्रमाने येणारे महिने, वार, बाराखडी
पाठ्यपुस्तकाला अनुसरुन समानार्थी, विरुध्दार्थी, अर्थपुर्ण शब्द, कोण ते लिहा
वचन बदला, वाक्प्रचार, शुध्द शब्द यावर आधारित प्रश्न
नैपूण्य चाचणी २ गणित
संख्या अंकात, अक्षरात लिहा.
संख्यांचा लहान मोठेपणा, चढता- उतरता क्रम
बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सर्व क्रियांवरील शाब्दिक उदाहरणे, रुपये- पैसे, वस्तुंचे आकार
या परीक्षेत उत्तीर्ण होण्या-या विद्यार्थ्यांना गुणपत्रक तसेच साधारण प्रत्येक ५० विद्यार्थ्यांमागे प्रथम येणा-या ३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रक व शालेय उपयोगी वस्तू (वह्या, पेन्सिली, कंपासपेटी व गोष्टीची पुस्तके) देण्यात येतील. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला परीक्षा शुल्क १०० रुपये आहे.